वॉशिंग्टन मराठी कला मंडळ आपले स्वागत करीत आहे!

वॉशिंग्टन डीसी खुर्द आणि सभोवतालच्या, मेरिलँड आणि व्हर्जिनिया राज्यांमधील काही उपनगरांचा समावेश असलेला; पोटॉमक नदीच्या तीरांवर वसलेला; अमेरिकेची राजधानी आणि शक्तिस्थान म्हणून ओळखला जाणारा; राजकीय, सामाजिक आणि नैसर्गिक समृद्धतेने नटलेला असा वॉशिंग्टन महानगर प्रदेश. ह्या परिसरात प्रामुख्याने एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून मराठी बांधवांची वसती होण्यास सुरुवात झाली.

जगाच्या पाठीवर कुठेही जा - कलेची ओढ असलेली मराठी माणसं काय करतात? वॉशिंग्टनही अपवाद ठरलं नाही. १९७५ साली, कलोपासनेचं आणि संवर्धनाचं उद्दिष्ट ठेवून मराठी कला मंडळाची स्थापना झाली.

आजमितीला, वॉशिंग्टन महानगर परिसरात राहणार्‍या हजारो मराठी बांधवांना मराठी कला मंडळाद्वारे नियमितपणे आयोजित केले जाणारे कार्यक्रम ही एक पर्वणीच वाटते. ह्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांना एकत्र येता येतं, स्नेहबंध सुरू करता/वाढवता येतात आणि महत्वाचं म्हणजे अभिरुचिपूर्ण कलाविष्काराचा आणि मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. मकरसंक्रांत, होळी, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव आणि दीपावली - हे सण परिसरातील सार्वजनिक शाळांमधील सभागृहांचा वापर करून साजरे केले जातात. कार्यक्रमांचं यशस्वी नियोजन म्हणजे अवघड काम - ते सुरळीत पार पडावं ह्यासाठी मंडळाची, दरवर्षी नव्याने नियुक्त होणारी कार्यकारिणी वर्षभर झटत असते.

स्थानिक तसेच बाहेरील कलाकारांनी सादर केलेले, मराठी मनाला भावणारे नाटक, शास्त्रीय/उपशास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रकला/शिल्पकला प्रदर्शन असे अनेकरंगी कार्यक्रम मंडळातर्फे प्रायोजित केले जातात. मराठी शाळा तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रणित कार्यक्रमांनाही कलामंडळातर्फे सक्रिय हातभार लावला जातो.

तुमचा वॉशिंग्टन भागात शिक्षण/नोकरी/व्यवसायासाठी येण्याचा विचार आहे? एखादा चित्ताकर्षक कार्यक्रम सादर करून वॉशिंग्टनच्या चोखंदळ पण रसिक प्रेक्षकांची दाद मिळवायचीय? समितीच्या कुठल्याही पदाधिकार्‍याशी संपर्क करा - तुमचं आपुलकीनं स्वागत होईल.


   Current Activities:

   RSVP is open until 11/10/2018

 दिवाळी धमाका २०१८

मकरसंक्रांतीच्या - 'सारेगम' आणि मे दिनाच्या 'गाव तशी भाषा' या स्थानिक कलाकारांच्या यशानंतर पुन्हा एकदा दिवाळीत धमाकेदार तब्बल ८ एकांकिका घेऊन येत आहे.  प्रत्येक एकांकिका वेगळ्या धाटणीची आहे. चला !! या संधीचा आस्वाद घेऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करूया !!

Food Team ह्या वेळेस कोणती चमचमीत मेजवानी  घेऊन येत आहेत !! बघा तर काय आहे ह्या वेळेस

https://www.facebook.com/MKMDCExec/videos/2130964467165838/?t=0

 

  पुरुषार्थ  - "प्रवीण तरडे" लिखित सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या मनातील विचारांच्या हेलकाव्यांची दर्जेदार  प्रस्तुती !!

   !!! Click on below link for President's and Director's invite for Natyamahotsav.

     https://drive.google.com/file/d/1nylYKB2qaqgVVp3GUSM4xFPo13oAsFT0/view?usp=sharing 

   purusharth

 

आम्ही NRI - तीन पिढ्यांमधील मिश्किल संवाद

 जाणून घेऊया 'आम्ही NRI चे कलाकार'

AmhiNRI

 

 पाहिलात  की नाही 'टॅक्स फ्री ' चा प्रोमोशनल  Video ??

https://drive.google.com/open?id=1yC-HxaIwAchiuRQZacqKEuiMRCrZZNFx

 

TAXFREE

पळा पळा कोण पुढे पळे तो !! 

गमतीदार कलाकारांची खुसखुशीत सादरीकरण !!!

PalaPala

 

मन निरागस हो !!!!!!!!  एक आगळीवेगळी कलाकृती 

 

manniragasho

एक एप्रिल !! नक्की काय घडले असेल  त्यादिवशी ?

ekApril

 साठेचं  करायच काय ?  या गहन प्रश्नाचे उत्तर सापडेल येत्या शनिवारी !!

 

sathenchekaykarayche

 

दिव्यस्पर्श  !! 

 

divasparsh

 ह्या क्षेत्रातील कार्यक्रमांचे वेळापत्रक

November 2018
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30