आमच्या विषयी

मराठी कला मंडळ – डीसी हे नॉन प्रॉफिट आणि कर माफ संस्था आहे जिचा प्राथमिक उद्देश वॉशिंग्टन डीसी प्रदेशात मराठी संस्कृतीला जोपासणे आहे.

वॉशिंग्टन मराठी कला मंडळ

१९७५ साली, कलोपासनेचं आणि संवर्धनाचं उद्दिष्ट ठेवून मराठी कला मंडळाची स्थापना झाली. स्थानिक तसेच बाहेरील कलाकारांनी सादर केलेले, मराठी मनाला भावणारे नाटक, शास्त्रीय/उपशास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रकला/शिल्पकला प्रदर्शन असे अनेकरंगी कार्यक्रम मंडळातर्फे प्रायोजित केले जातात. मराठी शाळा तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रणित कार्यक्रमांनाही कलामंडळातर्फे सक्रिय हातभार लावला जातो.

मराठी कला मंडळ – डीसी ही नॉन प्रॉफिट आणि कर माफ संस्था आहे जिचा प्राथमिक उद्देश वॉशिंग्टन डीसी परिसरात मराठी संस्कृतीला जोपासणे आहे. मराठी भाषा, संस्कृती आणी सभ्यतेमधे रुची ठेवणारे सगळे ह्या संस्थेचे सदस्य होऊ शकतात. मराठी कला मंडळाचे सदस्य होण्यासाठी धर्म, लिंग, वंश, रंग, प्रदेश किंवा देशाचे नागरिकत्व असण्याची अट नाही. आजच्या तारखेला मराठी कला मंडळाचे ५०० पेक्षा जास्त सदस्य आहेत जे वॉशिंग्टन डीसी, व्हर्जीनिया आणि मेरीलँड मधे राहतात.

मराठी संस्कृती व सभ्यता जपणे, तिचा प्रचार करणे आणि मराठी समाजाला एकत्र आणणे हेच मराठी कला मंडळाचे ध्येय आहे. इतर मंडळांच्या आणि भारतीय संस्थेच्या सहकार्यानी हे मंडळ अनेक कार्यक्रमांचे संयोजन करते. ह्या कार्यक्रमांमधे मराठी सदस्यांच्या संगीत, नाच, नाट्य अश्या अनेक कलांना वाव दिला जातो. त्याच बरोबर भारतातील उभरत्या आणि लोकप्रिय कलाकारांना येथे बोलावून सदस्यांचा दुवा मायदेशाशी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक भारतीय किंवा मराठी सणांना साजरे केले जाते ज्याने भारतीय आणि मराठी संस्कृतीचा ठेवा जपला जाईल.

मराठी कला मंडळ हे बृहन्महाराष्ट्र मंडळ ह्या संस्थेला संलग्न आहे. उत्तर अमेरिकेतील सगळी मराठी मंडळे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या छत्रछायेत संघटित झाली आहेत.

मराठी कला मंडळ संविधान

मराठी कला मंडळाचे सर्व कारभार ह्या संविधाना प्रमाणे केले जातात. आम्ही हे संविधान तुमच्या सोयी आणि माहितीसाठी पुरवले आहे.

संविधान डाऊनलोड करिण्यासाठी सदस्य असणे आवश्यक आहे. जर तुम्ही सदस्य असाल तर इथे Login करा.

Login Here

कार्यकारी समिती

2024 मध्ये आम्ही तुम्हाला उत्तमोतम कार्यक्रम आणि अनुभव द्यायचा प्रयत्न करू.