- This event has passed.
Maharashtra Din 2024
May 5, 2024 @ 4:00 PM - 8:00 PM
जत्रा! जत्रा म्हटलं की “काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं, मला बी जत्रला येऊन द्या की… “ ह्या लोकगीताचे बोल आपसूकच ओठावर येतात. महाराष्ट्रात जत्रेला विशेष महत्व आहे!!
जत्रेत भटकायला, मजा घ्यायला आवडत नाही अश्या व्यक्ती विरळाच! लहानपणी मनात असूनसुद्धा अनेक
कारणांनी ती मजा घेता आली नसेल, काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील तर आता ते करणे शक्य आहे
आपल्या MKM च्या जत्रेत! एकूणच जत्रा म्हणजे सर्वच वयोगटातील मंडळींसाठी, आणि विशेषतः बच्चे
कंपनीसाठी एक आनंद सोहळाच असतो.
जत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध खेळांची आणि मनोरंजनाची खासियत अन्यत्र कुठेही सापडणार नाही आणि
म्हणूनच काळाच्या ओघात हरवलेले बालपण शोधायला नक्की या !!
-
Tickets: [Member $5/person|Non-Member: $10/person], and you get to play 5 games.
-
Food: You can purchase a full meal, ice cream, cotton candy!
-
Music: Enjoy live music as you walk around the Jatra!

मराठी नाटक: “चारचौघी”
जिगीषा निर्मित, प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 3 अंकी मराठी नाटक!
चौकट भेदणारं तेच नाटक ३१ वर्षानंतर पुन्हा रंगभूमीवर..
महाराष्ट्र दिन निमित्त मराठी कला मंडळ, ग्रेटर वॉशिंग्टन डी.सी. आणि Five Dimensions घेऊन येत आहेत, उत्कृष्ट मराठी नाटक चारचौघी!!
या नाटकाने १९९०-२००० मध्ये रंगभूमी गाजवली होती आणि आता ३१ वर्षांनंतर ‘चारचौघी’ पूर्णपणे नवीन कलाकार आणि तंत्रज्ञांसह रंगभूमीवर येत आहे.
मुख्य कलाकार – रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे
Childcare rules:
- The child should be fully potty trained.
- Parents should provide the child with food and snacks.
- Parents should notify MKM about any allergies.
- MKM or child care provider will not administer any medicines.

